ठाणे : एका १० वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. ही भयंकर घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात घडली आहे. गुरुवारी झालेल्या या गुन्ह्यासाठी पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सी आर काकडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांनी चिमुकलीवर बलात्कार केला आणि नंतर कापडाच्या तुकड्याने गळा दाबून तिचा खून केला. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि ३०२ (हत्या) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु केली आहे. आरोपीला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




