कर्नाटक : प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांचा अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी भरदिवसा कथितपणे त्यांच्यावर चाकूने अनेक वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. चंद्रशेखर अंगडी, ज्यांना चंद्रशेखर गुरुजी म्हणूनही ओळखले जाते, यांची मंगळवार (5 जुलै) रोजी उत्तर कर्नाटकातील हुबळी येथील एका खाजगी हॉटेलच्या आवारात भोसकून हत्या करण्यात आली.
चंद्रशेखर गुरुजी हे कर्नाटकातील सुप्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ होते जे नियमितपणे कन्नड टीव्ही चॅनेलवर वास्तुशी संबंधित कार्यक्रमांसाठी दिसायचे. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर गुरुजींना KIMS रुग्णालयात हलवले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. आरोपींनी सरल वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांच्या पोटात आणि मानेवर अनेक वार केले. यामुळे त्यांचा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्याप्रमाणे आणि हुब्बाली पोलिसांनी पुष्टी केल्याप्रमाणे, हॉटेलच्या लॉबीमध्ये प्रवेश केल्यानंतर वास्तू तज्ज्ञावर दोन जणांनी हल्ला केला. काही अहवालांनुसार आरोपी महांतेश आणि वनजाक्षी हे दोघेजण गुरुजींचे जवळचे सहकारी मानले गेले आहेत. इतर काही अहवाल असे सुचवतात की या दोघांनी गुरुजींचे अनुयायी असल्याचा दावा केला होता आणि घटनेपूर्वी त्यांचे आशीर्वाद मागितले होते.
व्हिडिओमध्ये गुरुजी लॉबीमध्ये शिरून दोन हल्लेखोरांशी संभाषण करताना दिसत आहेत. त्यानंतर काही क्षणांनंतर ते गुरुजींवर निर्दयीपणे वार करताना दिसतात, तर गुरुजी स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जेव्हा हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करतात तेव्हा हॉटेल रिसेप्शनचे लोक आणि व्यवस्थापक गुरुजींना मदत करण्यासाठी धावण्याचा प्रयत्न करताना दिसतात, मात्र त्यांना हल्लेखोर चाकू दाखवत मागे जाण्याचा इशारा करतात.
#Karnataka famous astrologer of Sarala Vastu Chandrashekhar Guruji was stabbed to death by two assailants at a Hotel in #HUBBALLI. His close associate Mahantesh and Vanajakshi cuople’s hand is suspected as they were eyeing to grab Guruji’s property.@CrimeADay pic.twitter.com/BZebZK7gGc
— Devaraj Hirehalli Bhyraiah (@swaraj76) July 5, 2022
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हुब्बळी पोलिसांनी मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकही तयार केले आहे. चंद्रशेखर गुरुजी 2 जुलैपासून हॉटेलमध्ये थांबल्याची माहितीही पोलिसांनी दिली.




