हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. कुल्लूच्या सैंज व्हॅलीमध्ये सोमवारी सकाळी खाजगी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 3 प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये सुमारे 15 ते 20 लोक होते, अपघातात जखमी झालेल्या ३ जणांना कुल्लू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये शालेय विद्यार्थीही होते, अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसमध्ये स्थानिक लोकांव्यतिरिक्त शाळकरी मुलेही होती.
मदत आणि बचाव कार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना कुल्लू रुग्णालयात नेण्यात आले. बसमध्ये काही मृतदेह अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खराब झालेली बस जेसीबीच्या साहाय्याने उघडण्यात येत आहे.
तात्काळ मदतीची घोषणा
बसच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर प्रशासनाला अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. ही बस साईंज खोऱ्यातील शेनसार येथून साईंजच्या दिशेने येत होती. त्याचवेळी जंगला नावाच्या ठिकाणी एका वळणावर ही बस नियंत्रणाबाहेर जाऊन दरीत कोसळली. प्रशासनाने अपघातातील जखमींना 20 हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे.
हिमाचल प्रदेशात झालेल्या भीषण बस अपघातामध्ये ज्यांना प्राण गमवावे लागले आहेत, त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी PMNRF कडून प्रत्येकी 2 लाखांची एक्स-ग्रॅशिया मंजूर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.
The bus accident in Kullu, Himachal Pradesh is heart-rending. In this tragic hour my thoughts are with the bereaved families. I hope those injured recover at the earliest. The local administration is providing all possible assistance to those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 4, 2022




