नवी दिल्ली : LPG सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 198 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल. इंडियन ऑइलने 1 जुलै रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दिल्लीत 30 जूनपर्यंत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2219 रुपयांना मिळत होता. ज्याची किंमत 1 जुलैपासून 2021 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये 2322 रुपयांच्या तुलनेत आता हा सिलिंडर 2140 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2171.50 रुपयांवरून 1981 रुपयांवर आणि चेन्नईमध्ये 2373 रुपयांवरून 2186 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे.
व्यवसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे आता हॉटेलमधील जेवण देखील स्वस्त होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर :
दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1003 रुपयांना मिळत आहे.
उज्जवला गॅस योजना धारकांना अनुदान
केंद्र सरकारने उज्जवला गॅस योजनाधारकांना दिलासा होता. घरघुती सिलेंडरवर 200 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडरची किंमत ही 200 रुपयांनी कमी झाली आहे. हे अनुदान वर्षभरातील 12 सिलेंडरवर देण्यात येणार आहे.




