राजस्थान : राजस्थान पोलिसांनी उदयपूर हत्याकांडातील दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी या दिनही आरोपींची भररस्त्यात धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजस्थानचे प्रवक्ते नितीन अग्रवाल यांनी व्हिडीओ शेयर केला आहे. ते ट्विट करत म्हणाले कि, राजस्थान पोलिसांनी उदयपूर हत्याकांडातील दोन्ही मारेकऱ्यांना पकडले आहे. राजस्थान पोलिसांनी घटनास्थळी खबरदारी घेतली आहे. अजून बरेच काही करायचे आहे. हे काँग्रेसशासित राजस्थान आहे, इथे समाजकंटकांना अजिबात खपवून घेतले जाणार नाही.”
राजस्थान पुलिस ने उदयपुर हत्याकांड के दोनों हत्यारों को पकड़ लिया हैं ।
राजस्थान पुलिस ने मौक़े पर ही खातिरदारी की है। अभी और भी ख़ातिरदारी होनी है।
यह कांग्रेस शासित राजस्थान हैं यहाँ असामाजिक तत्व बिल्कुल भी बर्दाश्त नहीं किये जायेगे।#Udaipur pic.twitter.com/kBflQ0qzdB
— Nitin Agarwal (@nitinagarwalINC) June 28, 2022
काल संध्याकाळी राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. येथे नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या एका टेलरच्या निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी त्याच्या दुकानात घुसून तरुणाचा गळा चिरला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या हत्येतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. या दोन्ही आरोपींना अतिशय कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.




