Former Miss Brazil Gleycy Correia dies at 27
ग्लोबल

माजी मिस ब्राझील ग्लेसी कोरीयाचे निधन

ब्राझील : माजी मिस ब्राझील ग्लेसी कोरीया हिचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन झाले. ती रुटीन टॉन्सिल शस्त्रक्रियेसाठी गेली होती, मात्र ऑपरेशनच्या गुंतागुंतीमुळे तिचे निधन झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तानुसार, तिचे टॉन्सिल काढताना तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि 4 एप्रिल रोजी तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर दोन महिने कोमात राहिल्यानंतर मेंदूतील रक्तस्त्रावामुळे एका खाजगी क्लिनिकमध्ये तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्राझीलच्या मॅके येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आला होता. त्यानंतर ग्लेसी कोरीया हिच्या पार्थिवावर मंगळवारी तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या सानिध्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिचा जन्म ब्राझीलमधील एका शहरात, रिओ दि जानेरोच्या उत्तरपूर्व 120 मैलांवर अटलांटिक किनार्‍याजवळ, मॅके येथे झाला. ग्लेसी कोरियाने सोशल मीडिया पोस्टमध्ये ब्राझीलमधील गरिबीत वाढलेल्या तिच्या आयुष्याचा तपशील शेअर केला होता. तिने खुलासा केला होता की तिच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तिने 8 वर्षांची असताना मॅनिक्युरिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली होती. तिने स्पर्धेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ब्युटी सलूनमध्ये नेल आर्टिस्ट म्हणून नोकरी मिळवली होती. दरम्यान, ग्लेसी कोरिया हिने २०१८ मध्ये मिस युनायटेड कॉन्टिनेंट्स ब्राझीलचा ताज जिंकला होता. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचे बरेच फॉलोअर्स होते. तिने मेकअप आर्टिस्ट आणि इंफ्लुएन्सर म्हणून काम केले आणि 50,000 हून अधिक फॉलोअर्ससह एक इंस्टाग्राम पेज चालवले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत