ब्राझील : माजी मिस ब्राझील ग्लेसी कोरीया हिचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन झाले. ती रुटीन टॉन्सिल शस्त्रक्रियेसाठी गेली होती, मात्र ऑपरेशनच्या गुंतागुंतीमुळे तिचे निधन झाले. वृत्तानुसार, तिचे टॉन्सिल काढताना तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि 4 एप्रिल रोजी तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर दोन महिने कोमात राहिल्यानंतर मेंदूतील रक्तस्त्रावामुळे एका खाजगी क्लिनिकमध्ये तिचा मृत्यू झाला. […]

