मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.’ असं ते म्हणाले.
जयंत पाटील यांनी ट्वीट केलं कि, “महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.”
महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 23, 2022




