मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3-4 तासांत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे.
Thunderstorm accompanied with lightning,light to moderate spells of rain & gusty winds reaching 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Kolhapur, Sindhudurg, Ratnagiri,Satara and Sangli during next 3-4 hrs pic.twitter.com/dnvjMesmvy
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 2, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबई, पुण्यासह सांगली, सातारा, मराठवाडा, विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी सोसाट्याचा पाऊस झाला.




