Monsoon will come in Maharashtra between 7 to 10 June 2022
महाराष्ट्र शेती

मान्सून आगमनाची तारीख बदलली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार? जाणून घ्या…

मुंबई : केरळमध्ये १ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रात ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास संथगतीने होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हवामान विभागाने आधी केरळमध्ये मान्सून २७ मे पर्यंत पोहोचणार असा अंदाज वर्तविला होता. पण वातावरणातील बदलांचा आढावा घेऊन हवामान विभागाने सुधारित अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार २६ मे ते ८ जून या कालावधीत केरळपासून महाराष्ट्रापर्यंतच्या किनारपट्टीवर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत तुरळक पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्च्चेरी, कराईकल, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाबचा उत्तरेकडील भाग, हरयाणाचा उत्तरेकडील भाग, उत्तर प्रदेश, राजस्थानचा पूर्वेकडील भाग, मध्य भारत आणि ईशान्य भारत येथे पुढील चार ते पाच दिवसांत तुरळक पावसाची शक्यता आहे.

दक्षिण अरबी समुद्रात जमिनीलगत पश्चिमेकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढत असून, त्यांची उंचीही वाढताना दिसत आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या क्षेत्रात ढगांची गर्दीही दिसून येत आहे. केरळसोबत लक्षद्वीप लगतच्या क्षेत्रातही पुढील काही दिवसांत मान्सून प्रगती करू शकेल.’ आयएमडीच्या चार आठवड्यांच्या विस्तारित अंदाजानुसार, ७ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा पश्चिम-नैऋत्येकडून होण्याची शक्यता असून, २६ मे ते ८ जून या कालावधीत केरळपासून महाराष्ट्रापर्यंतच्या किनारपट्टीवर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या शुक्रवारच्या अंदाजात म्हटल्याप्रमाणे केरळमध्ये मान्सूनचे आगमन जाहीर झाले, तरी त्यापुढे मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान पोषक नसेल. दरम्यान, दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह मालदीव, तसेच लक्षद्वीप बेटांलगतच्या काही भागांत मान्सूनने शुक्रवारी प्रवेश केल्याचे आयएमडीने जाहीर केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत