मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने एका महिलेला अटक केली आहे.
या महिलेने धनंजय मुंडे यांना धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन. तसेच 5 कोटी आणि महागडा मोबाइल दिला नाही तर सोशल मीडियात बदनामी करेन, अशी धमकी या महिलेने दिली होती. या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.
5 कोटी द्या नाहीतर बलात्काराची तक्रार करेन, धनंजय मुंडे यांना महिलेकडून धमकी…




