Rajkumar Santoshi sentenced to one year in check bounce case
मनोरंजन

राजकुमार संतोषी यांना एक वर्षाचा तुरुंगवास, संतोषी यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

मुंबई : चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना ५० लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. जर त्यांनी 2 महिन्यांत रक्कम भरली नाही तर त्यांना आणखी एक वर्ष तुरुंगात राहावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राजकुमार संतोषी आणि अनिल जेठानी यांचे चांगले संबंध होते. यामुळे व्यवसाय मोठा करण्यासाठी त्यांनी अनिल जेठानी यांच्याकडून पैसे घेतले. त्याबदल्यात 22 लाख रुपयांचे तीन स्वतंत्र चेक देण्यात आले. मात्र, तिन्ही चेक बाऊन्स झाल्याने अनिल जेठानी यांनी पैशांसाठी गुन्हा दाखल केला. यानंतर अनिल जेठानी यांनी राजकुमार संतोषी यांना कायदेशीर नोटीस पाठवली.

नोटिशीला उत्तर न मिळाल्याने राजकुमार संतोषी यांच्यावर कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता राजकुमार संतोषी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, मी सेलिब्रेटी असल्यामुळे माझ्याबरोबर हे सर्वकाही होत आहे. आम्ही सोपे लक्ष्य आहोत. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही या प्रकरणी अपील करू. मला आशा आहे की न्याय मिळेल. या प्रकरणांची सुनावणी राजकोटच्या अतिरिक्त मुख्य न्यायमूर्तींसमोर झाली. फिर्यादींनी पैसे परत करताना कोऱ्या धनादेशात गैरव्यवहार केला असून, व्यवहारात कोणतीही शिल्लक नसल्याचा दावा राजकुमार संतोषी यांनी केला आहे. त्यानंतर न्यायालयाने बँक अधिकाऱ्यांना साक्षीसाठी बोलावले आणि त्यांनी तक्रारदाराची बाजू घेतली.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी राजकुमार संतोषी यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली. यासोबतच त्यांना ६० दिवसांत पैसे परत करण्याचे आदेशही दिले आहेत. तसे न केल्यास आणखी एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल. राजकुमार संतोषी यांनी अनेक मोठे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत