RBI recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँकेने 303 ग्रेड बी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या RBI भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 28 मार्चपासून सक्रिय होतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI ची ऑफिशियल वेबसाइट rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण भरती अधिसूचना वाचून घ्यावी.
अर्ज प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख – 28 मार्च 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
रिक्त जागांचा तपशील:
या RBI भरतीमध्ये एकूण 303 पदे भरायची आहेत.
- 238 पदे अधिकारी ग्रेड बी जनरलसाठी,
- 31 पदे अधिकारी ग्रेड बी DEPR साठी
- 25 पदे ग्रेड B DSIM साठी
- 6 पदे सहाय्यक व्यवस्थापक राजभाषासाठी आहेत.
- असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल आणि सिक्युरिटीसाठी ३ जागा रिक्त आहेत.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज फी – रु 850.
अधिक तपशीलांसाठी संपूर्ण सूचना पहा. (येथे आज जारी करण्यात आलेले नोटिफिकेशन बघू शकता.)




