girl missing since 2019 found hidden under staircase
ग्लोबल

बेपत्ता असलेली चिमुकली दोन वर्षांनी घरातच पायऱ्यांखाली सापडली, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण…

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये कस्टडी न मिळाल्यामुळे चार वर्षांच्या मुलीचे तिच्याच आई-वडिलांनी अपहरण केले आणि तिला दोन वर्षे घरात लपवून ठेवण्यात यश मिळवले, आता ही 6 वर्षांची मुलगी पोलिसांना सापडली आहे. 2019 सालापासून हरवलेली मुलगी न्यूयॉर्कमधील हडसन येथील तिच्या घराच्या पायऱ्यांखाली लपलेली आढळली. जवळपास दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी घरातील जिन्याखाली बांधलेल्या एका खास खोलीत सापडली. मुलीची तब्येत चांगली आहे. दरम्यान, या मुलीचे तिच्या आई-वडिलांनीच अपहरण केल्याचे समजते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पॅस्ले शल्टिस नावाच्या सहा वर्षांच्या मुलीला, सागरटीस शहरातील एका घराच्या पायऱ्यांखालील एका चेंबरमधून बाहेर काढले. मुलगी सुखरूप आहे. पॅस्लेचे अपहरण तिचेच आई-वडिल किम्बर्ले कूपर आणि कर्क शल्टिस यांनी केले होते. या दोघांनाही मुलीला सोबत ठेवण्याचा कायदेशीर अधिकार नाही. 2019 मध्ये तिची कस्टडी न मिळाल्यामुळे पॅस्लेचे त्यांनीच अपहरण केले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, अपहरणानंतर पॅस्लेला घरातील एका गुप्त खोलीत ठेवण्यात आले होते, जी खोली अतिशय लहान, थंड आणि ओलसर होती.

दरम्यान, सोमवारी पोलिसांना मुलीबाबत सुगावा लागला. त्यानंतर त्यांनी सर्च वॉरंट घेऊन घराची झडती घेतली. पोलिसांनी सांगितले की, तपासासाठी विशेष प्रकारचे साधन वापरले गेले होते, जे अनेक लाकडी पायऱ्या काढण्यासाठी आवश्यक होते. याच्या मदतीने तासाभराच्या प्रयत्नानंतर त्यांना पायऱ्यांखाली छोटे-छोटे ठसे दिसले. त्यांनी तात्काळ शोध घेतला आणि त्यांना तिथे मुलगी पॅस्ले आणि तिची 33 वर्षीय आई सापडली. पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना आणि आजोबांना अटक करून मुलीला तिच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत