नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. ह्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत 2 महिलांसह 12 भाविकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच २० पेक्षा अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती आहे.
Extremely saddened by the loss of lives due to a stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Spoke to JK LG Shri @manojsinha_ Ji, Ministers Shri @DrJitendraSingh Ji, @nityanandraibjp Ji and took stock of the situation.
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2022
पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून, एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिक माहिती स्पष्ट झाली नाही. माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
या घटनेची माहिती होताच बचाव पथक तसेच जवान यांच्याकडून बचावकार्य केले जात आहे. जखमी भाविकांना मंदिर परिसरातून हलवून रुग्णालयात दाखल केले जात आहे.
हेल्पलाइन क्रमांक 01991-234804, 01991-234053 हे एलजी जम्मू आणि काश्मीर आणि श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाच्या कार्यालयाने जारी केले आहेत. याशिवाय, इतर हेल्पलाइन क्रमांकांवरही माहिती मिळवता येईल: पीसीआर कटरा: 01991232010 / 9419145182, पीसीआर रियासी 0199145076 / 9622856295, डीसी ऑफिस रियासी कंट्रोल रूम: 01991232010 / 9196232010 / 9419145182.




