श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला. श्रीनगरच्या जेवान भागात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर गोळीबार केला. सध्या 14 जवान जखमी झाल्याची माहिती आहे, त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय राखीव पोलिसांच्या (IRP) 9व्या बटालियनची गाडी श्रीनगरमधील जेवानमधील पंथा चौक-खोनमोह रस्त्यावरून जात होती. दहशतवाद्यांनी या गाडीवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
#Terrorists fired upon a police vehicle near Zewan in Pantha Chowk area of #Srinagar. 14 personnel #injured in the attack. All the injured personnel evacuated to hospital. Area cordoned off. Further details shall follow. @JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 13, 2021




