The body of a person
कोल्हापूर महाराष्ट्र

कोल्हापुरात गव्याचा हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, अन्य दोघे गंभीर जखमी

कोल्हापूर : गव्याचा हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील सौरभ संभाजी खोत या २१ वर्षीय तरुणाने गव्याचा हल्ल्यात आपले प्राण गमावले. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सौरभ हा ग्रामपंचायत सदस्य संभाजी खोत आणि माजी सरपंच पूजा खोत यांचा एकुलता एक मुलगा आहे. गेल्या तीन दिवसांपासून या गव्याचा वावर कोल्हापूर शहराच्या परिसरात आहे. गवा पुन्हा नैसर्गिक अधिवासात जावा यासाठी वनखात्यासह वनप्रेमी संघटनेचे सदस्य प्रयत्नशील होते. त्यानंतर गवा भुयेवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.  शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गवा भुयेवाडीत शिरला. प्रल्हाद पाटील आपल्या गुऱ्हाळाजवळ होते, यावेळी त्याठिकाणी गवा आला. पाटील यांनी गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी गव्याने पाटील यांना धडक मारत त्यांना जमिनीवर आदळलं. प्रल्‍हाद पाटील याच्या मांडीला शिंग लागले व खांदादेखील फ्रॅक्चर झाला.

त्यानंतर गावकऱ्यांनी चवताळलेल्या गव्याला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर गवा बिथरला आणि त्याने सौरभ खोत या तरुणावर हल्ला केला. सौरभच्या डाव्या बाजूच्या बरगडीला गव्याचे शिंग लागले, यात तो गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. तर शुभम पाटील पळत असताना पडला असता त्याच्या अंगावर गव्याने पाय दिल्यामुळे तोदेखील जखमी झाला.

या भागातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा गवा भुयेवाडी गावाबाहेरून जोतिबा डोंगराच्या दिशेने गेला असून वनविभागाची रेस्क्यू टीम त्याचा पाठलाग करत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत