संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘बेशिस्त वर्तन’ केल्यामुळे विरोधी पक्षाच्या बारा खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. एकूण १२ खासदारांना त्यांच्या अनियंत्रित वर्तनासाठी राज्यसभेच्या संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.
अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “हे सभागृह गंभीरपणे दखल घेते आणि अध्यक्षांच्या अधिकाराची पूर्ण अवहेलना करणे, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करणे, अभूतपूर्व गैरवर्तन आणि अवमानकारक कृतींद्वारे सभागृहाच्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा आणणे, बेशिस्त आणि हिंसक वर्तन आणि राज्यसभेच्या 254 व्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी सुरक्षा कर्मचार्यांवर केलेले हेतुपुरस्सर हल्ले याचा तीव्र निषेध करते.
या खासदारांना निलंबित करण्यात आले :
- एलामाराम करीम (CPM)
- फुलो देवी नेताम (कॉँग्रेस)
- छाया वर्मा (कॉँग्रेस)
- रिपुन बोरा (कॉँग्रेस)
- बिनॉय विश्वम (CPI)
- राजमणी पटेल (कॉँग्रेस)
- डोला सेन (TMC)
- शांता छेत्री (TMC)
- सय्यद नासिर हुसेन (कॉँग्रेस)
- प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना)
- अनिल देसाई (शिवसेना)
- अखिलेश प्रसाद सिंग (कॉँग्रेस)




