चंदीगड : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहियाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी केवळ अफवा आहे. याबद्दल अफवा पसरल्यानंतर स्वतः निशा दहियाने एका व्हिडीओद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. कुस्तीपटू निशा दहियाने काही वेळापूर्वी एक व्हिडिओ जारी केला आहे की हरियाणामध्ये तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी खोटी असून ती ती पूर्णपणे बरी आहे. ती सध्या सिनियर नॅशनल खेळण्यासाठी गोंडा येथे गेलेली आहे.
View this post on Instagram
निशा दहियाने काही दिवसांपूर्वीच सर्बियामध्ये कांस्यपदक जिंकले आहे. कुस्तीपटू निशा दहियाचे आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी निशासह जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या 23 वर्षांखालील पाच कुस्तीपटूंचे अभिनंदन केले होते. पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, शिवानी, अंजू, दिव्या, राधिका आणि निशा यांचे जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल अभिनंदन. त्यांची कामगिरी शानदार आहे, ज्यामुळे हा खेळ देशभरात आणखी लोकप्रिय होईल.
Congratulations to Shivani, Anju, Divya, Radhika and Nisha for winning medals at the Wrestling Championships in Belgrade. Their performance is special and will contribute to wrestling becoming even more popular across India. https://t.co/pI6aByu2ZB
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2021
निशा दहियाने शुक्रवारी बेलग्रेड, सर्बिया येथे कुस्ती अंडर -23 जागतिक स्पर्धेत 65 किलोमध्ये कांस्य पदक जिंकले होते. पीएम मोदींनी इतर महिला कुस्तीपटूंसोबत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचे कौतुक केले.
सोनीपतमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली कुस्तीपटू ही नवोदित खेळाडू असून तिचे नाव देखील निशा दहिया आहे.




