मुंबई : कारचालकाने अचानक युटर्न घेतल्यामुळे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात घडला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. कार चालकाने वेग कमी न करता अचानक युटर्न घेतला. मात्र, यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीला कारचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकीवरील तरुण दुचाकीसह घसरत पुढे गेला आणि समोरुन येणारी दुचाकीदेखील अपघातग्रस्त झाली. या अपघातानंतर दोन तरुणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालकाने तेथे न थांबता युटर्न घेत तिथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिस कारचालकाचा शोध घेत आहेत.
Watch this #Mumbai
Where are we heading?
Vehicles riding anywhere, No traffic discipline, No Rules…#Mumbai:
Two killed as bike crashes into car taking sudden U-turn on flyover in Lower Parel pic.twitter.com/pZtDsHjwKe
— मुंबई Matters™✳️ (@mumbaimatterz) October 1, 2021




