'Scotch' organization award announced to Beed district for eradication of child marriage
बीड महाराष्ट्र

बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी ‘स्कॉच’ संस्थेचा पुरस्कार जाहीर

बीड : बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा “स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार” बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्या बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्हयात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पाऊले उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. याचीच पोच पावती म्हणुन स्कॉच या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने या कामाची दखल घेत बीड जिल्हयाची बाल विवाह निर्मुलनासाठी निवड केली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा 22 सप्टेंबर 2024 रोजी राजधानी नवी दिल्ली येथे 99 व्या स्कॉच परिषदेनिमित्त आयोजित एका सोहळयात प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार सध्या पुणे महानगर परिवहन मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालक तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे या हा पुरस्कार स्वीकारतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत