क्राईम महाराष्ट्र मुंबई

अमानुष कृत्य! मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवला

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचे अमानुष कृत्य देखील केले आहे. या महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भयंकर घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. बलात्काऱ्यांना अतिशय कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

पीडित महिलेवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु, या महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना अमानवीय आणि संतापजनक असून आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे आता महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत