minor girl rape
क्राईम देश

नात्यांना काळिमा! सात वर्षांच्या चिमुकलीवर आजोबा, मामा आणि मामेभावाने केला बलात्कार

चेन्नई : चेन्नईमध्ये नात्यांना काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिचे आजोबा, मामा आणि मामाचा मुलगा या तिघांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईच्या मडीपक्कमची आहे. जिथे पीडित मुलीच्या आईने महिला पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. 2 ऑगस्ट रोजी या चिमुकलीचे 62 वर्षीय आजोबा (आईचे वडील) मुलीच्या घरी आले आणि मुलीच्या संमतीने आपल्या नातीला सोबत घेऊन त्यांच्या घरी गेले. पोलिसांनी सांगितले की, नातीला घरी घेऊन गेल्यानंतर तिच्यावर तिच्या आजोबांनी बलात्कार केला. त्यानंतर तिच्या 42 वर्षीय मामाने आणि मामाच्या 17 वर्षांच्या मुलाने देखील तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलगी तिच्या घरी परत आली, तेव्हा तिने तिच्या आईला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर या चिमुकलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ती तात्काळ मुलीला शासकीय रुग्णालयात घेऊन गेली, तिथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर, महिला आपल्या 7 वर्षांच्या पीडित मुलीसह महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तेथे संपूर्ण घटनेची माहिती देत ​​तक्रार नोंदवली. महिलेची तक्रार गांभीर्याने घेत पोलिसांनी आरोपींविरोधात IPC कायद्याच्या संबंधित कलमांखाली आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी पीडित मुलीचे आरोपी आजोबा आणि मामा यांना अटक केली. त्यानंतर या आरोपींना न्यायालयात हजर केले आणि तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर केले होते. तेथून त्याला बाल सुधार केंद्रात पाठवण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत