पुणे : पुणे शहरातील उत्तमनगरमधील कोपरे गाव येथे एका गॅरेजला आग लागून गाड्यांचे नुकसान झाले. या आगीत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळाल्यानंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
कोपरे गाव येथे बस आणि इतर गाड्यांची दुरुस्ती करणारे मोठे गॅरेज आहे. या गॅरेजला रात्री उशिरा अचानक आग लागली. या दुर्घटनेत ३ बस जळून खाक झाल्याची माहिती आहे. आग कशी लागली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.




