हळद मधासह एकत्रित केली जाते, याला गोल्डन हनी म्हणूनही ओळखले जाते, हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा समावेश आहे. आपण या शक्तिशाली नैसर्गिक अँटीबायोटिककडे दुर्लक्ष करू शकत नाही. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात पाश्चात्य औषधांमध्ये त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. भारतात या दोन्ही पदार्थांचा अनेक शतकांपासून विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापर केला जात आहे.
हळद ही भारतातील वनस्पती आहे. ती प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात असतेच. परंतु, तिचे फायदे किती असामान्य आहेत हे अनेक जणांना अजूनही माहीत नाहीत. हळदीमध्ये मज्जासंस्थेचे संरक्षण करण्याची क्षमता असते. तसेच ती दाहक-विरोधी, अँटीव्हायरल, बुरशीविरोधी, ट्यूमरविरोधी एक विलक्षण प्रतिजैविक आहे. तिच्यात रोग निर्माण करणारे जीवाणू नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. मधात देखील अँटीव्हायरल, बुरशीविरोधी आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात.
हळद- मधाचे फायदे :
- हळद आणि मध यांचे मिश्रण दाहक-विरोधी असते.
- या मिश्रणाचे सेवन केल्याने अपचनाची समस्या दूर होते.
- थंडी, सर्दी-पडसे, खोकला या समस्या असल्यास अर्धा चमचा मध आणि हळद यांचे मिश्रण खा आणि काही वेळ पाणी पिऊ नका. आपण त्याच्याबरोबर तुळशीचे देखील सेवन करू शकता.
- जेवणानंतर हळदीचे सेवन करणे मूत्रपिंड आणि फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरते.
- हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
- त्वचेसाठी फायदेशीर : त्वचेच्या समस्यांपासून जसे की फ्रिकल्स, सुरकुत्या, डाग इत्यादींपासून मुक्त होण्यासाठी हळद, मध आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट बनवा आणि थोडीशी सुकेपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा, याचा त्वचेला खूप फायदा होतो.
- हळद आणि मध यांचे मिश्रण वीर्य पातळ असणे आणि शीघ्रपतन या समस्यांवर रामबाण उपाय आहे. यासाठी फक्त एक चमचा मध मिसळून एक चमचा हळद पावडर रोज सकाळी रिकाम्या पोटी खावी.
- हळद कर्करोगाच्या पेशी आणि ट्यूमरची वाढ थांबवते.
- यात नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे विषारी घटक शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होते.
- यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते असेही मानले जाते.
- शरीरातील चरबी साठवण्याची क्षमता कमी करते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आवश्यक ठरते.
आहारात मिठाचं प्रमाण किती असावं? WHO ने दिला अतिशय मोलाचा सल्ला




