केरळमधील इडुक्की जिल्ह्यात तुफान पाऊस पडत असून पर्यटन स्थळ असणाऱ्या मुन्नार येथून २५ किमी अंतरावर भूस्खलन झालं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जणांची सुखरुप सुटका कऱण्यात आली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. अजून किती लोक अडकले आहेत याची माहिती सध्या प्रशासन घेत आहे.
गावाला जोडणारा पूल पावसात वाहून गेला असल्याने आणि पावसामुळे तिथे पोहोचण्यात अनेक अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे.




