पुणे : रविवारी सकाळी माळशेज घाटाजवळील काळू धबधब्याजवळ दरड कोसळून पुण्यातील २३ वर्षीय हिमालकुमार बिनोदकुमार सिंग (खराडी) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा साथीदार अंशुमन मौर्य (२३) जखमी झाला. दोघेही पुण्यातील ट्रेकिंग गटाचा भाग म्हणून धबधब्याला भेट देण्यासाठी गेले होते. सकाळी ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर हा गट काळू धबधब्यावर पोहोचला, जो पाच टप्प्यात कोसळतो आणि […]
टॅग: landslide
इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली १०० पेक्षा अधिक जण अडकल्याची शक्यता, बचावकार्य युद्धपातळीवर
रायगड : खालापूर तालु्क्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री १०.३० – ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत गावातील जवळपास ५० घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ५ मृतदेह सापडले आहेत. ढिगाऱ्याखाली १०० पेक्षा अधिक जण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इर्शाळवाडी आदिवासीबहुल गाव असून […]
खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम
पुणे : खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. गुरुवारी मध्यरात्री मंकी हिल ते ठाकूरवाडी यादरम्यान दरड रेल्वे ट्रॅकवर कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील अप दिशेच्या ट्रॅकवर ही दरड कोसळली […]
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; ५ जणांचा मृत्यू
केरळमधील इडुक्की जिल्ह्यात तुफान पाऊस पडत असून पर्यटन स्थळ असणाऱ्या मुन्नार येथून २५ किमी अंतरावर भूस्खलन झालं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जणांची सुखरुप सुटका कऱण्यात आली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. अजून किती लोक अडकले आहेत याची माहिती सध्या प्रशासन घेत आहे. गावाला जोडणारा पूल पावसात […]




