टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीमध्ये उपांत्य पूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघ आता उपांत्य फेरीत बेल्जियम विरुद्ध खेळणार आहे. भारतीय हॉकी संघाने ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात भारताने संपूर्ण वचर्स्व ठेवले. भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ केला. पहिल्या हाफमध्ये भारताकडून दिलप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर गुरजंत सिंगने १६ व्या मिनिटाला गोल करून संघाला २-० अशी आघाडी मिळून दिली. दुसऱ्या हाफमध्ये ग्रेट ब्रिटनने पहिला गोल करून भारताची आघाडी २-१ अशी कमी केली. पण ५७ व्या मिनिटाला हार्दिकने फिल्ड गोल करून संघाला विजयी ३-१ अशी आघाडी मिळवून दिली.
अद्भुत, अद्वितीय और अविश्सनीय ?
India are through to the semis. ?
?? 3:1 ??#INDvGBR #IndiaKaGame #HaiTayyar #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/l802EiWYvE
— Hockey India (@TheHockeyIndia) August 1, 2021




