ब्रिटन : ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाल्याचे एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. सेक्स दरम्यान, या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट तीन सेंटीमीटर फ्रॅक्चर झाला. आतापर्यंत अशा प्रकारच्या ज्या घटना समोर आल्या आहेत, त्यामध्ये आडवा (horizontal) फ्रॅक्चर व्हायचा, परंतु प्रायव्हेट पार्ट अनुलंब (vertical) स्थितीत फ्रॅक्चर झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाडे नसतात, परंतु त्यामध्ये क्रॅक होण्याची शक्यता असते. या व्यक्तीची केस ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. डॉक्टरांनी सांगितले की यापूर्वी आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये प्रायव्हेट पार्टचे फ्रॅक्चर नेहमीच क्षैतिज होते, परंतु, ही अशा प्रकारची पहिलीच केस आहे. परंतु, यावेळी ट्यूनिका अल्बुजिनियामध्ये (tunica albuginea) समस्या दिसून आली आहे. हा इरेक्टाइल टिशूभोवतीचा असा संरक्षक लेयर असतो, जो या भागात रक्त पोहोचविण्याचे कार्य करतो.
या प्रकरणात, युरोलॉजिस्ट म्हणतात की प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याच्या 88 टक्के केस या लैंगिक संबंधादरम्यान उद्भवतात. प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याची इतर कारणे देखील आहेत, ज्यात अत्यधिक हस्तमैथुन आणि झोपेची विशिष्ट स्थिती देखील जबाबदार मानली गेली आहे. डॉक्टर म्हणाले की horizontal फ्रॅक्चरच्या बाबतीत सहसा फ्रॅक्चर झाल्याचा आवाज येतो, परंतु या पेशंटमध्ये असे झाले नाही. फ्रॅक्चर दरम्यान या व्यक्तीला कोणताही आवाज ऐकू आला नाही.
डॉक्टर म्हणाले की खासगी भागाच्या फ्रॅक्चरची बहुतेक प्रकरणे चाळिशीतील पुरुषांमध्ये आढळतात. तथापि, या दुखापतीनंतर या 40 वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सूज आली होती. याव्यक्तीवर ६ महिने उपचार केल्यानंतर ही व्यक्ती लैंगिकदृष्ट्या सामान्य देखील बनली आहे. टेलीग्राफच्या अहवालानुसार, 1924 पासून आतापर्यंत पुरुषांमध्ये प्रायव्हेट पार्टच्या फ्रॅक्चरची 1600 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.




