flying car called aircar launched and travelled amidst airports Completes Historic First Inter City Flight In Slovakia
ग्लोबल तंत्रज्ञान

Video : तंत्रज्ञानाची किमया! हवाई कारची यशस्वी चाचणी

ब्रातिस्‍लावा: उडणाऱ्या कार असाव्यात असे जगभरातील बर्‍याच जणांना वाटते, हे स्वप्नवत वाटत असले तरी आता हे स्वप्न कोठेतरी प्रत्यक्षात उतरणार असल्याचे दिसत आहे. नुकतीच एका फ्लाइंग कारची चाचणी घेण्यात आली असून ही कार हवेत उडत एका विमानतळावरून दुसर्‍या विमानतळावर देखील पोहोचली. रस्त्यावर चालण्यासोबतच हवेत उडण्याची क्षमता असलेल्या या कारने यशस्वी उड्डाण केले आणि यशस्वी प्रवास केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही कार एअरकार नावाच्या कंपनीने तयार केली आहे. या कारने २८ जून रोजी स्‍लोवाकियातील आंतरराष्ट्रीय विमानतळ नित्रा आणि ब्रातिस्लावा दरम्यान प्रवास केला. या दोन ठिकाणच्या विमानतळादरम्यानचे अंतर गाठण्यासाठी या हवाई कारला ३५ मिनिटांचा कालावधी लागला. ही कार अवघ्या तीन मिनिटांमध्ये उड्डाण घेण्यास तयार होते. या कारमध्ये १६० हॉर्स पॉवरचे बीएमडब्लू इंजिन लावण्यात आले आहे.

एकदा इंधन भरल्यानंतर ही कार ८२०० फूट उंचावरून जवळपास १००० किमी पर्यंतचा प्रवास करू शकते. यामध्ये एक कायमस्वरुपी प्रोपेलर आणि पॅराशूट लावण्यात आले आहे. ही कार हवेत १७० किमी प्रतितास या वेगाने उडू शकते. या कारचा हवेतील वेग ३०० किमी प्रतितास इतका वाढवण्याबाबत कंपनीचा विचार सुरू आहे. या कारने आतापर्यंत ४० तासांचे यशस्वी उड्डाण केले आहे. आपल्या उड्डाणा दरम्यान कारने ४५ अंश सेल्सिअस कोनात स्वत: ला वळवले.

ही कार उड्डाण घेण्यासाठी दोन मिनिट आणि १५ सेंकद इतका कालावधी घेते. इतकाच वेळ कारचे रुपांतर विमानात होण्यासाठी लागतो. या हवाई कारची चाचणी यशस्वी झाल्याने येत्या काही वर्षात दोन शहरांमधील प्रवास करण्यासाठी हवाई कारचा उपयोग केला जाऊ शकतो. सध्या लोकांना या हवाई कारबद्दल उत्सुकता असून अमेरिकेमध्ये या कारची डिमांड वाढत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत