Accused of rape fled away with handcuffs
महाराष्ट्र मुंबई

पोलिसांना धक्का देत बलात्काराचा आरोपी हातकडीसह पसार

मुंबई : मुंबईत बलात्काराचा आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील कांदिवली भागात हा प्रकार घडल्यानंतर चारकोप पोलिसांनी आरोपी अविनाश यादव याचा शोध सुरु केला आहे. अँटीजन चाचणी करुन परतत असताना गाडी सिग्नलवर थांबल्यानंतर संधी साधत आरोपीने पोलिसांना धक्का दिला आणि हातकडीसह पळून गेला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय अविनाश यादव असे या आरोपीचे नाव आहे. त्याचे एका 17 वर्षीय मुलीवर प्रेम होते. मात्र तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हते. यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यामुळे पीडितेच्या पालकांनी अविनाश यादववर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर यादवला 26 जून 2021 रोजी मुंबईतील चारकोप पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी सकाळी त्याला अँटीजन चाचणी करण्यासाठी नेले होते. तिथून परतत असताना कांदिवली सिग्नलवर गाडी थांबली होती. त्याचा फायदा घेत पोलिसांना धक्का देत तो पळाला. त्यानंतर लगेचच याबाबत चारकोप पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात मेसेज पाठवला असून त्याचा शोध सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत