मुंबई : मुंबईत बलात्काराचा आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील कांदिवली भागात हा प्रकार घडल्यानंतर चारकोप पोलिसांनी आरोपी अविनाश यादव याचा शोध सुरु केला आहे. अँटीजन चाचणी करुन परतत असताना गाडी सिग्नलवर थांबल्यानंतर संधी साधत आरोपीने पोलिसांना धक्का दिला आणि हातकडीसह पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय अविनाश यादव असे या आरोपीचे नाव आहे. […]

