मुंबई : मुंबई येथे रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) जवानांच्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना अचानक खाली पडला. खाली पडल्यानंतर ती व्यक्ती प्लॅटफॉर्म व ट्रेन यांच्या दरम्यान अडकण्याची शक्यता वाटत असतानाच आरपीएफच्या जवानाने धावत जाऊन त्या व्यक्तीला वाचवले.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईतील बोरिवली रेल्वे स्टेशनची आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे, जेव्हा ती व्यक्ती ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हा ट्रेनचा वेग खूप जास्त होता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचताच ती व्यक्ती प्लॅटफॉर्मवर पडली. यानंतर, ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्म दरम्यानच्या अंतरादरम्यान अडकू शकली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, आरपीएफ जवानाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या व्यक्तीचे प्राण वाचले. व्हिडिओमध्ये आरपीएफ जवानासह आणखी एक व्यक्ती मदतीसाठी आलेली दिसत आहे.
Salute to RPF constable who saved a precious life of a passenger who fell while trying to get down from a running at Mumbai’s Borivali Railway Station The passenger was dangerously close to the gap between the train & platform.@PiyushGoyal @kayjay34350 @Soldier_forlife pic.twitter.com/6MYjoMBdlO
— Subodh Srivastava ?? (@SuboSrivastava) July 1, 2021




