No Need For Strict Lockdown In Pune says Mayor murlidhar mohol
पुणे महाराष्ट्र

पुण्यात सोमवारपासून कठोर निर्बंध, सायंकाळी पाच वाजल्यानंतर संचारबंदी

पुणे : कोरोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जुन्या नियमावलीमध्ये बदल केल्यानंतर पुणे महापालिकेनेही नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार, पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच वाजल्यानंतर संचारबंदी लागू असेल. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून काल राज्यात एका डेल्टा प्लस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं शुक्रवारी नवे आदेश जारी केले. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने निर्बंध कठोर करत महापालिका क्षेत्रात जमावबंदी लागू केली आहे. त्यानुसार पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, सायंकाळी पाच नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही.

  1. अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस चार वाजेपर्यंत सुरू राहणार
  2. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार, रविवारी पूर्ण बंद राहणार. इतर दिवशी चार वाजेपर्यंत सुरू राहणार.
  3. सार्वजनिक बस सेवा ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार. उभ्यानं प्रवासास परवानगी नाही.
  4. मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्ण बंद राहणार
  5. रेस्टॉरण्ट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार. दुपारी चारनंतर
  6. पार्सल देता येणार. शनिवार, रविवार फक्त पार्सल सेवा देता येणार
  7. मैदाने, उद्याने, वॉक, सायकलिंगला रोज सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत मुभा
  8. खासगी कार्यालये दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार. शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार
  9. आउटडोअर स्पोर्ट्स सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत सुरू ठेवता येणार
  10. धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद राहणार.
  11. सामाजिक, धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम फक्त ५० लोकांच्या उपस्थित साजरे करता येणार
  12. लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची अट राहील.
  13. व्यायामशाळा, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं चालवता येणार
  14. मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवारी पार्सल सेवा देता येईल.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत