fire broke out near mata vaishno devi bhawan
देश

माता वैष्णो देवी भवनाजवळ भीषण आग, बचावकार्य सुरू

माता वैष्णो देवीच्या दरबारात भीषण आग लागली आहे. कालिका भवनाजवळ काउंटर क्रमांक दोन जवळ आग पसरली आहे. बचावकार्य सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथून नैसर्गिक गुहेचे अंतर सुमारे शंभर मीटर आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हीआयपी गेटजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अचानक आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत