World Environment Day: The need to focus on what is needed to protect the environment
ग्लोबल देश ब्लॉग

जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरण संरक्षण आवश्यक, जाणून घ्या हवामान बदलाच्या धोक्यात भारताची स्थिती..

नवी दिल्ली : प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपण पर्यावरण आणि निसर्गावर अवलंबून आहोत, तरीही जगभरातील देश पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे सर्वाधिक दुर्लक्ष करतात. कोरोना महामारीने ज्याप्रमाणे वेगाने धावणाऱ्या जगाला थांबवलं, तो मानवजातीला पर्यावरणाने दिलेला एकप्रकारचा इशाराच आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (United Nations Environment Programme – UNEP), वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि द इकोनोमिक्स ऑफ लँड डेग्रेडेशन यांनी ‘स्टेट ऑफ फायनान्स फॉर नेचर’ हा अहवाल सादर केला आहे. UNEP चे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन म्हणाले कि, “साथीच्या रोगाने आपल्याला ‘बिल्ड बॅक ऍज-युजुअल’ वरुन ‘बिल्ड बॅक बेटर’ वर जाण्याची संधी दिली आहे. म्हणजेच सर्व अगोदर होतं त्यासारखं करण्याऐवजी अगोदर होतं त्यापेक्षा चांगलं करण्याची संधी दिली आहे. परंतु अनेक देशांनी यापासून कोणताही धडा घेतलेला नाही आणि ही सवय संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक आहे. वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपायांवर खर्च वाढवण्याच्या गरजेवर या अहवालात भर देण्यात आला आहे.

UNEP आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या एका अहवालानुसार, जगातील 50 मोठ्या अर्थव्यवस्थांनी साथीच्या काळात १४.६ लाख कोटी डॉलरचे मदत पॅकेज प्रदान केले. परंतु, या प्रचंड पॅकेजपैकी केवळ 368 अब्ज डॉलर्स (२.5 टक्के) अशा कामांवर खर्च करण्यात आले, जे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहेत.

या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की जगातील अर्थव्यवस्था मुख्यत: पर्यावरणावरच अवलंबून आहे, परंतु लोक समजून घेण्यास तयार नाहीत. हे अज्ञान संपूर्ण जगाला धोकादायक ठरत आहे. जागतिक जीडीपीच्या निम्म्याहून अधिक भाग निसर्गावर कमी-अधिक प्रमाणात अवलंबून आहे. यामध्ये शेती, अन्न व पेये आणि बांधकाम अशी क्षेत्रे आहेत, जी मुख्यत्वे निसर्गावर अवलंबून आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आठ लाख कोटीची डॉलर्सची भर घालत आहेत.

तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 80 लाख आणि भारतात १३ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात

वाईट सवयी त्वरित बदला :

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या टेरेसा हार्टमॅन म्हणाल्या, ‘आपण अन्न, पोशाख, फायबर आणि लाकूड इत्यादींसाठी नैसर्गिक संसाधने वापरण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. आपण अशाप्रकारे जमिनीचे शोषण करणे चालू ठेवू शकत नाही. हवामान बदलांविषयी बोलताना प्रत्येकाचे लक्ष तापमानाकडे असते, परंतु कुणीही जमीन वापराच्या बदलाकडे लक्ष देत नाही.

हवामान बदलाच्या धोक्यात भारताची स्थिती :

या वर्षाच्या सुरूवातीस प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स’ नुसार, 2019 मध्ये हवामान बदलाचा परिणाम झालेला भारत हा सातव्या क्रमांकावरचा देश होता. मोझांबिक, झिम्बाब्वे, बहामास, जपान, मालावी आणि अफगाणिस्तान सर्वाधिक प्रभावित झाले होते.

  • या परिणामामुळे मान्सून भारतामध्ये एका महिना जास्त काळ राहिला आणि बर्‍याच ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती. 14 राज्यांतील 1800 लोकांनी आपले प्राण गमावले आणि 18 लाख लोक विस्थापित झाले.
  • देशात आठ चक्रीवादळे आली आणि त्यापैकी सहा ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीत पोहोचली.

सरकारला नक्कीच या सर्व धोक्यांची जाणीव आहे आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने प्रयत्नही केले जात आहेत. परंतु,
नागरिकांनी देखील खासगी पातळीवर जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मग त्यात प्लास्टिकचा वापर न करणे असेल किंवा झाडे लावणे आणि वनस्पती संरक्षण, या सर्व गोष्टी पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहेत. आपण वैयक्तिक पातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकते.

World Hunger Day : जागतिक भूक दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी, भूक निर्देशांकात भारताची स्थिती काय? जाणून घ्या..

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत