पंजाब : लुधियाना येथून बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. अधिकाऱ्यावर केलेल्या या गंभीर आरोपानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. पीडित महिला राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू असून तिने पोलिस आयुक्तांकडे न्याय मागितला आहे. त्यांनी या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीचे आश्वासन दिले आहे.
पीडित महिलेने आरोप केले आहेत की संबंधित पोलिस अधिका्याने तिला क्रीडा कोट्यात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तो तिला वारंवार हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार करत होता. इतकेच नाही तर आरोपी पोलिस अधिकाऱ्याने तिचा अश्लील व्हिडिओही बनविला असल्याचे पीडितेने सांगितले. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करत राहिला आणि तिच्यावर वारंवार बलात्कार करत राहिला. काही काळानंतर हा आरोपी खोटे बोलत असल्याचे पीडित महिलेला समजले, तेव्हा पीडित महिलेने त्याला विरोध केला. परंतु, त्यानंतर त्याने महिलेला तिचा अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तिच्यावर बलात्कार करत राहिला.
सेक्स डॉल मार्गोला बॉडीबिल्डर युरीने दिला घटस्फोट, आता महिलेबरोबर डेट करण्यास तयार पण..
महिलेने आरोप केल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी तात्काळ एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपांची पुष्टी झाल्यास योग्य कारवाईही केली जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
महिलेने पतीची हत्या करून मृतदेह किचनमध्ये पुरला, स्वतःच्या लहान मुलीसमोर केलं भयंकर कृत्य…




