लखनौ : एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील इनायतनगर ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये संपत्तीच्या वादातून शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील पाच जणांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. या घटनेत पती-पत्नी, त्यांची दोन मुलं आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे. या तीनही मुलांचं वय दहा वर्षापेक्षा कमी आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.
बापरे! खराब हवामानामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ स्पर्धकांचा मृत्यू
ही हत्या मालमत्तेच्या वादावरुन झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाचा त्यांच्याबरोबर एकाच घरात राहत होता, त्याने हा गुन्हा केला असावा कारण तो सध्या फरार आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत, परंतु, अद्याप ही हत्या करण्यात किती जणांचा समावेश होता, याबाबत माहिती मिळालेली नाही. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत.
प्रेमीयुगुलाने घरच्यांच्या विरोधाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास वाहन चालक जबाबदार नाही




