Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

युवा शक्तीला देश सेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : देशाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनात उपविजेतेपद पटकाविणे हे साधारण व्यक्तीचे कार्य नसून त्यासाठी देशसेवेची जिद्द आणि हिंमत लागते. अशा युवाशक्तीला देशसेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. आता उपविजेतेपदावरच न थांबता पुढल्या काळात महाराष्ट्र अव्वल असला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्राच्या पथकाने प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन […]

CM Uddhav Thackeray gave instructions about new corona virus
महाराष्ट्र मुंबई राजकारण

परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 2 : परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे असे सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘कुलाबा कन्व्हर्सेशन’ या परिषदेत ऑनलाईन उद्घाटनपर भाषण करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत हॅमबर्गच्या स्टेट कौन्सिलर […]

Chief Minister Uddhav Thackeray's instructions to build a grand art gallery to suit the glory of Marathi theater
महाराष्ट्र

मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे, भव्य कलादालन साकारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा आणि त्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभे करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील समिती कक्षात सादरीकरण तसेच आढावा बैठक झाली. […]

Make a proposal to make maximum accommodation available for the police - Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र

पोलिसांसाठी जास्तीत जास्त निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध झाल्यास पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार आहेत. त्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून, जास्तीत जास्त संख्येने आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]

work together to increase ground water level - Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र

भूजल पातळी वाढविण्यासाठी एकत्र येऊन काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत मोठी घसरण होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाणीपुरवठा, कृषी तसेच मृद व जलसंधारण या तीन विभागांनी एकत्र मिळून काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी अटल भूजल योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज […]

All the important points in the speech of Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

मुंबई : आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं ते म्हटले. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

CM inspects Mumbai-Pune expressway (missing link)
पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली. प्रकल्पाचा तपशील : मुंबई पुणे […]

Madhav Bhandari criticized CM Uddhav Thackeray
नाशिक

आठ- नऊ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होतं आहे. खरं तर जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासल्याचं हे एक वर्ष म्हणावं लागेल. महाराष्ट्राला 25 वर्ष मागे घेऊन जाणारा ठाकरे सरकारचा कारभार आहे आणि मुख्यमंत्र्यांबद्दल तर बोलायचं काम नाही. आठ ते नऊ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही ते काम उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलंय, अशी टीका भाजप […]

Devendra Fadnavis strongly criticized the Thackeray government
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची भाषा नाक्यावर होणाऱ्या भांडणांसारखी, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र […]

Thackeray-government's scam Kirit Somaiya
महाराष्ट्र राजकारण

ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा, आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव स्थगित – किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी […]