मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि नागपूरमधील अलिकडच्या हिंसाचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा सांगितले की पोलिस आयुक्तांनी (सीपी) असे म्हटले आहे की चौकशी सुरू आहे आणि अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष निघाला […]
टॅग: मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, पण शरद पवारांनी अडथळा घातला; संजय राऊतांचा धक्कादायक खुलासा
मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फूट, यावर नवीन वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं, ज्यात त्यांनी स्पष्ट केलं की, “जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. आम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला.” त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक […]
हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन
मुंबई : हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस आयुक्त विवेक […]
राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
सांगली : राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून व्यापाऱ्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. […]
औरंगाबाद प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे सुरू असलेल्या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्यादृष्टीने लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे शहर जागतिक […]
पुष्करसिंग धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
उत्तराखंड : उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंग धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या तीरथसिंग रावत यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. तो मंजूर झाला आहे. पुष्करसिंग धामी हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा सीटवरून आमदार आहेत. तीरथसिंग रावत […]
महिलेने नवजात बाळाला मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ बेवारस सोडलं, रक्ताच्या ठशांवरून महिलेचा शोध
हिमाचल प्रदेश : एका महिलेने आपल्या नवजात बाळाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेवारस अवस्थेत सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सरकारी निवासस्थानाजवळ हे नवजात बाळ सुरक्षा रक्षकांना आढळलं. त्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर काही तासांतच हे बाळ एका अविवाहीत महिलेचं असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून […]
गुजरातमध्ये लव्ह जिहाद कायदा होणार लागू, जाणून घ्या या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद
गुजरात : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लव्ह जिहाद कायद्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार, जबरदस्तीने धर्मांतर करणार्यांवर आणि फसवणूक करुन विवाह करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 15 जूनपासून गुजरात राज्यात हा कायदा लागू होणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहाद विधेयक गुजरात विधानसभेत जोरदार गदारोळात पारित झाले. गुजरातचे राज्यपाल आचार्य […]
राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर काम करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव […]
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या […]