मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या […]
टॅग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा 20 ऑक्टोबरपासून शुभारंभ, जाणून घ्या…
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ 20 ऑक्टोबर 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली. सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे […]
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषित करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच राज्यात 23 ठिकाणी आधुनिक वाहन चाचणी केंद्र तसेच वाहन परवान्यासाठी स्वयंचलित वाहन चलन चाचणी पथ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या हद्दीतील ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी […]
राज ठाकरेंच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन […]
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर […]
उमदा साहित्यव्रती हरपला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली
मुंबई : ‘मराठी वाङ्मयाच्या सेवेला वाहून घेतलेला उमदा साहित्यव्रती हरपला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्यिक चळवळीला वाहून घेतले होते. लेखन, संशोधन आणि सर्जनशील साहित्य निर्मिती बरोबरच त्यांनी क्रीडा क्षेत्रात संघटनात्मक कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. त्यांच्या […]
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात 79 पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर सदर आपत्ती प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेस ही मान्यता दिली. ठाणे महानगरपालिकेने या संदर्भात आपत्ती प्रतिसाद पथकात वर्ग-२ व वर्ग-३ मध्ये ७९ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला […]
‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह जी चे महत्त्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार […]
स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही देतानाच शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय […]
पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; केंद्रीय गृहमंत्र्यांचे मानले आभार
मुंबई : देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या […]










