मुंबई : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना जाहीर केली असली तरी राज्याकडे पैसे नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्या, असा आरोप विरोधकांकडून होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, विरोधकांच्या या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. मी कालही […]
टॅग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शासनाचे जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अमरावती : राज्य शासन ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील तळागळातील सर्व घटकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देत आहे. शासन जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य देत आहे व पुढेही देत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित अमरावती येथील हनुमान गढी येथे प्रसिद्ध कथा वाचक पंडीत प्रदीप […]
राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा
नवी दिल्ली : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महत्त्वाच्या बैठकांसाठी आज सकाळी नवी दिल्ली येथे आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून […]
स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य, ५८ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले असून त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे एक सेवेची संधी आहे. या कामाच्या माध्यमातून राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुधारणेच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सह्याद्री […]
दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती
मुंबई : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी […]
पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल – मुख्यमंत्री
पंढरपूर : पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप समारंभात बोलताना व्यक्त केला. पंचायत समिती पंढरपूरच्या आवारात पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज […]
कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
सातारा : कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरे ता. महाबळेश्वर येथील […]
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया…
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ […]
गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब, शेतकरी, महिला यांना न्याय देताना उद्योग , पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट […]