मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी विविध राजकीय आंदोलनातील प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. आज गिरगाव न्यायालयाने तो फेटाळून लावला. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू […]
टॅग: बच्चू कडू
बच्चू कडू यांना 17 वर्षांपुर्वी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी 20 हजार रुपयांचा दंड
अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. या प्रकरणात अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सोमवारी कडू यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ५ ऑगस्ट २००५ रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात […]
भिक्षेकरी पुनर्वसनासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करा, बच्चू कडू यांच्या सूचना
पुणे : प्रमुख शहरांमध्ये भिक्षेकऱ्यांची संख्या खूप वाढत आहे. ही समस्या रोखण्यासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिल्या. महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेत भिक्षेकरी पुनर्वसनाबाबत आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यमंत्री कडू म्हणाले, भिक्षेकरी प्रवृत्ती कमी करण्यासाठी त्यांचे कायम पुनर्वसन करणे हा […]
दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद – बच्चू कडू
जळगाव : मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले. चाळीसगाव जि. जळगाव […]
वाचनालय व व्यायामशाळा उभारुन साकारणार शहीद निलेश धांडे यांचे स्मारक – पालकमंत्री ना. बच्चू कडू
अकोला : देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणे ही सोपी गोष्ट नाही. ज्याने देशाला सर्वस्व दिले त्याला आपण काय देणार. शहीदांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या बलिदान भावनेचा आदर करणे आवश्यक आहे. युवा पिढीपुढे त्यांचा आदर्श सतत ठेवला पाहिजे. त्यासाठी वरुर जऊळका गावात एक चांगले वाचनालय व व्यायामशाळा उभारुन शहीद निलेश धांडे यांचे स्मारक साकारले जाईल, जेणेकरुन चांगली […]
निसर्गसुंदर मेळघाटचा विकास होण्याच्या भूमिकेतून कामे करावित, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
अमरावती : मेळघाट परिक्षेत्रातील धारणी व चिखलदरा तालुक्यांना निसर्गाने भरभरून सौंदर्य देणगी दिली आहे. या ठिकाणी पर्यटन व जैवविविधतेला भरपूर वाव आहे. मेळघाटातील धारणी, चिखलदरा तालुक्यातील गडगा, तापी, स्काय वाक यासारखे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी व धोरणात्मक निर्णयासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे. मेळघाटच्या निसर्गसौंदर्याच्या आनंद घेण्यासाठी पर्यटनाला चालना द्यावी व रोजगारही निर्माण करावा. […]
व्यापाऱ्याने पैसे न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, हा धक्का सहन न झाल्याने मोठ्या भावाचा मृत्यू
अमरावती : अमरावतीतील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी अशोक भुयार यांच्या अंत्यसंस्कारावरुन परत येताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने मोठ्या भावाचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी दोघा भावांना अखेरचा निरोप देण्याची वेळ भुयार कुटुंबावर ओढवली आहे. देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन पेटलं असतानाच अमरावतीतून ही दुःखद बातमी आली. व्यापाऱ्याने […]
जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना कोरोना
मुंबईः महाराष्ट्राचे जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी जात होते. अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी सरकारी कामकाजाचा आढावा घेतला होता. कोरोना संकटावर सुरू असलेल्या सरकारी उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. या काळात ते अनेकांच्या संपर्कात आले होते. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही कोरोना झाला आहे. कोरोना […]






