शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्राप्त डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांनी पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्वतःची भर घालून एकूण रुपये ३२,००० शैक्षणिक संस्थांना देणगी म्हणून देण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. या पुरस्काराची मूळ रक्कम रुपये १५,००० इतकी […]
टॅग: डॉ. सोमनाथ गिते
दारूमुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचीही जनजागृती आवश्यक – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
पुणे, दि. ६ : “दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे” असा इशारा मद्याच्या प्रत्येक बाटलीवर छापलेला असतो. मात्र, या इशाऱ्यांचा केंद्रबिंदू मुख्यतः शारीरिक आरोग्यावर असतो. मद्यपानामुळे होणारे मानसिक परिणामही तितकेच गंभीर असून, त्याबाबत जनजागृती करणेही तितकेच आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विल्यम साळवी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. साळवी यांनी दिलेल्या निवेदनात […]
व्यसनमुक्तीवरील तुमच्या कार्याचा व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी नक्की फायदा होईल, डॉ. सोमनाथ गिते यांचे राज्यपालांकडून कौतुक
पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी डॉ. सोमनाथ गिते यांनी त्यांची भेट घेतली आणि व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा केली. राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक केले व प्रशंसापत्र दिले. तसेच व्यसनमुक्तीचे कार्य आवश्यक असून हे कार्य असेच सुरु ठेवा, व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी तुमच्या कार्याचा नक्की फायदा होईल, असेही […]
डॉ. सोमनाथ गिते यांना ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार २०२२’ प्रदान
संगमनेर : मागील १०-१२ वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर सातत्याने लेखन करणारे डॉ. सोमनाथ गिते यांना २०२२ चा ‘व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य गिते यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत शांताई प्रतिष्ठान संचलित स्वर्ग व्यसनमुक्ती केंद्राच्या तसेच सिद्धिविनायक हाॅस्पिटल यांच्या संयुक्त […]
डॉ. सोमनाथ गिते यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान
पुणे : राज्यस्तरीय गुणिजन गौरव सन्मान सोहळा नुकताच पुणे शहरातील सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणवंताना राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. […]





