रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊन आजपासून (3 जून) 9 जूनपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापने बंद राहणार आहेत. केवळ 11 वाजेपर्यंत घरपोच दुधाचा पर्याय देण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून जिल्हा प्रवेशासाठी ई पास अनिवार्य करण्यात […]
टॅग: कोरोना
गौप्यस्फोट : कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही, कोरोना ही चीनचीच निर्मिती…
लंडन : सार्स सीओव्ही २ म्हणजे कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही. कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढण्याची मागणी जगभरात लावून धरण्यात येत असतानाच हा विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केल्याचा दावा एका अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेतील चीनचे वैज्ञानिक यात सामील होते, नंतर त्यांनी तो वटवाघळातूनच आला असे दाखवण्यासाठी त्याचे रूप […]
सामूहिक शक्ती आणि सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. संपूर्ण देश कोरोनाविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. या संकटात भारत अनेक नैसर्गिक आपत्तींचाही धैर्याने सामना केला आहे. आव्हान कितीही मोठे असो भारताचा विजय संकल्प तेवढाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्या सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले आहे, […]
IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने UAE मध्ये होणार, BCCI चा मोठा निर्णय
मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत (IPL) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएलचे 31 सामने खेळायचे राहिले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवण्यात आली होती. NEWS ? […]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनुभव व धड्यांच्या आधारे सुयोग्य नियोजन करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘हे’ निर्देश
मुंबई : ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उपायांची अधिक प्रभावी कार्यवाही व्हावी आणि नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत, यादृष्टीने पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव व धड्यांच्या आधारावर सुयोग्य नियोजन आराखडा बनवण्यासाठी आणखी एक स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा विचार करावा,’ असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत. कोरोनाविषयक जनहित याचिकांविषयीच्या सुनावणीनंतर न्या. अमजद […]
१ जूननंतर लॉकडाऊनचे निर्बंध होणार शिथिल, राज्य सरकारकडून नियोजन सुरु, जाणून घ्या…
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, तरीही राज्यातील संचारबंदी तातडीने मागे न घेता निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणण्यात येईल. राज्य सरकारकडून सावध पावले टाकण्यात येणार आहेत. कडक निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांत दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे […]
मोठी बातमी! कर्मचार्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य
नवी दिल्ली : रतन टाटा प्रत्येक वेळेस देशासाठी मोलाचे योगदान देतात, त्यांनी तशीच एक मोठी घोषणा करून एक नवीन आदर्श समोर ठेवला आहे. टाटा स्टील कंपनीने कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान बरेच लोक मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्यांचे मृत्यूही झाले. अशा परिस्थितीत […]
जिवापेक्षा भीती मोठी! कोरोना लसीच्या भीतीमुळे ग्रामस्थांनी घेतल्या नदीत उड्या
उत्तर प्रदेश : एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लस घेण्याकरिता देशभरातील आरोग्य केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तर बाराबंकीमध्ये एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. आरोग्य विभागाची टीम एका गावात कोरोना लस देण्यासाठी पोहोचली, मात्र मेडिकल टीमला बघताच काही ग्रामस्थांनी लसीकरण टाळण्यासाठी सरयू नदीत उड्या घेतल्या. मिळालेल्या माहितीनुसार, रामनगरच्या सिसोदा गावात शनिवारी आरोग्य विभागाची […]
ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासन जबाबदार, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय
औरंगाबाद : ऑक्सिजन नसल्यामुळे किंवा ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही, अशा परिस्थितीत जर रुग्णाचा मृत्यू झाला तर शासनास जबाबदार धरण्यात येईल, अशी दुरुस्ती ऑर्डर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी केली आहे. खंडपीठाने 19 मेच्या आदेशात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय आणि […]
मोठी बातमी : करदात्यांना मोठा दिलासा, CBDT ने वाढवून दिली प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes- CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे. प्राप्तिकर अधिनियम, १९६१ च्या कलम ११९ अंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड प्राप्तिकर विवरणपत्र […]










