पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पवार साहेबांचा आशीर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. नाशिक महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बायपासच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कोल्हे म्हणाले कि, “खेड बाह्यवळण रस्त्याचे श्रेय द्यायचे […]
टॅग: Uddhav Thackeray
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू, पाण्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ठरणारे, वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. ते वळवावे लागेल. त्यातून जलक्रांती होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले […]
31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, अजित पवार यांनी केली मोठी घोषणा
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यांनी यावेळी स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी घटना असल्याचं म्हटलं. तसेच राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील आश्वासन दिल आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका […]
‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे जगातील परिस्थिती पाहून सावध व्हा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. त्याबरोबरच तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एमएमआरडीएने मालाड येथे […]
प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई शहरासह महानगर परिसराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. हे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री […]
मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याबाबत मोठा निर्णय, मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासींचे सक्षमीकरण होणार शक्य
मुंबई : मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासींचे सक्षमीकरण करणे शक्य होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खारगे समितीच्या शिफारशी स्वीकारल्यामुळे व्यक्त केला आहे. वनविभागाचे तत्कालिन प्रधान सचिव विकास खारगे यांच्या समितीच्या शिफारशी मान्य करून मोहफुलांवरील निर्बंध हटविण्याबाबत गृह विभागाने तसा शासन निर्णय काढला आहे. राज्य उत्पादन शुल्क कायद्यातील बदलाबाबत वन विभाग, आदिवासी विकास आणि राज्य […]
खुशखबर! महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना लस, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!
मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट अधिक गडद होत असतानाच महाराष्ट राज्यात लसीकरण प्रक्रियेला अतिशय झपाट्यानं वेग आला आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला मोफत लसीकरणाचा मुद्दा अखेर निकाली निघाला. महाराष्ट्र वासीयांना खुशखबर देत राज्यातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचा निर्णय […]
महाराष्ट्रात १ मेपासून होणाऱ्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह…
मुंबई : 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली असून राज्य सरकारनेही व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जवळपास 8 कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु असं असलं तरी आता या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण राज्याला हव्या तितक्या प्रमाणात लसीच उपलब्ध झालेल्या […]
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नव्याने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे..
मुंबई : कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर […]
मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले
मुंबई : राज्यात उद्या रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या निर्णयावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. पण प्रत्यक्षात अत्यंत […]










