अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे सुशांतच्या अंत्यविधीला हजर नव्हती. यावरून तिला सोशल मिडीयावर ट्रोलही करण्यात आलं. मात्र एका मुलाखतीदरम्यान अंकिताने अंत्यविधीला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. अंकिता म्हणाली, मी सुशांतला कधीच त्या अवस्थेत पाहू शकले नसते. मी त्याला त्या अवस्थेत पाहिले असतं तर मी ते चित्र कधीच विसरू शकले […]
टॅग: sushant
सुशांत आत्महत्येचा विचारही करू शकत नाही- अंकिता लोखंडे
सुशांत काम भेटलं नाही म्हणून कधीच तणावात जाणार नाही,न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने तिचे मत व्यक्त केले. या काळातही भरपूर चित्रपटात कामाच्या संधी त्याला मिळतच होत्या. उलट सुशांत अनेक चित्रपट नाकारत असे. त्याला बौद्धिक कुवत चांगली असलेल्या लोकांशी बोलायला आवडत असे. सुशांत सर्वांशी भरभरून बोलायचा. सगळेजण म्हणत आहेत त्याला डिप्रेशनचा आजार होता. मात्र मला […]
सुशांतच्या मृत्यूच्या CBI चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अलका प्रिया नावाच्या तरुणीने याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितलं, “पोलिसांना त्यांचं काम करु द्या. व्यक्ती चांगली होती की वाईट याचा याच्याशी काही संबंध नाही. जर तुमच्याकडे काही ठोस आहे तर मुंबई उच्च न्यायालयात जा,” असं सरन्यायाधीशांनी […]
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे […]
सुशांतने अभिनेत्रीसोबत सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही, स्वस्तिका मुखर्जीचा खुलासा
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. मध्यंतरी सुशांतने ‘दिल बेचारा’च्या सेटवर सहकलाकार संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र याप्रकरणी संजनानंतर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीनेदेखील मौन सोडलं आहे. ‘सुशांतने सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही’, असं तिने ‘पिंकव्हिला’सोबत बोलताना सांगितलं आहे. “सेटवर असताना सुशांतने संजनासोबत कधीच गैरवर्तन केलं नाही. […]
सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, मोदींनी दिलं केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राला उत्तर
अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला एक महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३६ जणांची चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. परिणामी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करत एक पत्र देखील लिहिलं होतं. त्यांच्या या […]






