मुंबई : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही ऐतिहासिक सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि संबंधित नियामक संस्थांच्या प्रयत्नांमुळे शिर्डीतील हवाई वाहतूक सेवा नव्या उंचीवर पोहोचली आहे. या नव्या टप्प्याचा लाभ यात्रेकरूंना तसेच पर्यटकांना होणार असून, […]
टॅग: Shirdi
शिर्डीत ‘नक्शा’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू; शहरी भूअभिलेख डिजिटायझेशनसाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल
शिर्डी : केंद्र शासनाने शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील १५२ नगरपालिकांमध्ये “नक्शा” प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील १० नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश आहे. त्यापैकी एक असलेल्या शिर्डी नगरपरिषद क्षेत्रात आजपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शहराच्या हद्दीतील संपूर्ण भूभागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशातील रायसेन येथे “नक्शा” […]
शिर्डी, चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार; शासकीय काम अधिक गतिमान होणार
मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून शासकीय काम अधिक गतिमान होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. शिर्डी आणि चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील […]
शिर्डी-अहमदनगरच्या विकासात समृद्धी आणणारा महामार्ग!
अहमदनगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी १० किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गालगत जिल्ह्यात २ कृषी […]
तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास… शिवसेना महिला आघाडी आक्रमक
भक्तांच्या कपड्यासंदर्भात साई संस्थान आणि तृप्ती देसाई यांच्या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला केला होता. यावर आता शिवसेनेकडून तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे. आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास […]
सुजय विखे यांच्या हस्ते ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे उद्घाटन, साईबाबांचे आशिर्वाद घरबसल्या मिळणार
भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या हस्ते ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे उद्घाटन करण्यात आलं. भाविकांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवण्यात आली आहे. देश-विदेशात साईबाबांचे लाखो भक्त आहेत. साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. पण कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या संकल्पनेतून शिर्डीचे […]