online sai blessing box
महाराष्ट्र

सुजय‌ विखे यांच्या‌ हस्ते ‌ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन, साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळणार

भाजपचे खासदार ‌सुजय‌ विखे यांच्या‌ हस्ते ‌ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन करण्यात आलं. भाविकांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देश-विदेशात साईबाबांचे लाखो भक्त आहेत. साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. पण कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या‌ ‌संकल्पनेतून शिर्डीचे प्रसिद्ध चित्रकार हेमंत यांनी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घरपोच साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवली आहे. स्वत: बरोबर मित्र, आप्तेष्ट नातेवाईक यांना‌देखील हे बॉक्स पाठवण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भाजपचे खासदार सुजय‌ विखे, माजी ‌जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे तसेच धनश्री ‌विखे यांच्या उपस्थित हा सोहळा साई मंदिराजवळ पार पडला. सुज‌य यांनी उद्घटनावेळी पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते यांचेसह ‌सर्व खासदारांना दिवाळी निमित्त ही भेट पाठवत असल्याचं सांगितलं आहे.

या गिफ्ट‌ बॉक्समध्ये महिला बचत गटांकडून खरेदी‌ केलेल्या‌ साईबाबांच्या विविध वस्तू‌ असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या ‌महिलांना यामुळे दिलासा‌ मिळणार असून त्यांची‌ दिवाळीदेखील गोड‌ होणार असल्याचं माजी‌ जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

या‌‌ साई ब्लेसिंग बॉक्समध्ये साई समाधीवरील फुलांपासून बनवेलेली अगरबत्ती, झेंडू फुलांपासून बनवलेला अष्टगंध, चित्रकार हेमंत वाणी यांनी रेखाटलेले साई कृपा दृष्टी‌ चित्र, साई नामस्मरण सीडी, अगरबत्ती स्टँन्ड, गौरीपासून बनवलेले धुप, अगरबत्ती स्टँण्ड‌, मेणबत्ती‌‌, दिवा अशा नऊ वस्तूंचा‌ समावेश आहे. हा बॉक्स 1500 रुप‌यांना देण्यात येणार असून‌‌ ज्या भाविकांसाठी‌ तो पाठवण्यात‌ येणार आहे त्यांच्या नावाने साई संस्थानच्या अन्नदानासाठी 51 रुपयांची‌‌ देणगी पावती सदर बॉक्समध्ये असणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत