भक्तांच्या कपड्यासंदर्भात साई संस्थान आणि तृप्ती देसाई यांच्या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला केला होता. यावर आता शिवसेनेकडून तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे.
आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि तोंडाला काळं फासू असा धमकीवजा इशारा शिवसेना महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी दिला आहे. शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावं, असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं होतं. त्यावर तृप्ती देसाई यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे तृप्ती देसाईंविरोधात आता शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे.